मुंबई : महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी (महापारेषण) चे मुख्य अभियंता (पारेषण) कादरी सय्यद नसीर यांनी इलेक्ट्रिकल पावर सिस्टम या विषयात पदव्युत्तर पदवी एम ई (ईपीएस) छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून प्राप्त केली.
महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजीव कुमार (भा.प्र.से.) यांनी त्यांच्या या यशाबद्दल त्यांना शुभेच्छा दिल्या. कादरी म्हणतात, “माझे यश हे महापारेषणाचे सर्व अधिकारी, सहकारी, मित्र आणि नातेवाईक यांच्या मदतीमुळे शक्य झाले. वय फक्त केवळ आकडा असून ते शिक्षण किंवा ज्ञान मिळविण्यासाठी अडथळा ठरत नाही.
या पदवीचा अनिवार्य भाग म्हणून त्यांनी “एस ई पी आय सी कन्वर्टर फेड इंडक्शन मोटर ड्राईव्हसाठी पावर क्वालिटी इंप्रुव्हमेंट” या विषयावर सविस्तर अभ्यास करून आपला प्रकल्प सादर केला. प्रा. डॉ. नितीन जे. फडकुले यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली त्यांनी हा पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केला. त्यांना विद्युत अभियांत्रिकी विभागप्रमुख डॉ. सुनंदा घाणेगांवकर आणि जीईसीएचे प्राचार्य डॉ. संजय डंभारे यांचेही मार्गदर्शन लाभले.