सत्याचाच विजय होईल! रोहित पवारांच्या ईडी चौकशीवर सुप्रीया सुळेंची प्रतिक्रिया

24 Jan 2024 14:37:04

Supriya Sule & Rohit PAwar


मुंबई :
सत्यमेव जयते. सत्याचाच विजय होईल, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळेंनी आमदार रोहित पवारांच्या ईडी चौकशीवर दिली आहे. शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांना साखर कारखाना घोटाळ्याप्रकरणी ईडीने समन्स बजावले आहेत. बुधवारी ते चौकशीसाठी ईडीच्या न्यायालयात हजर झाले. यावेळी त्यांच्यासोबत सुप्रीया सुळेदेखील गेल्या होत्या. दरम्यान, त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
 
सुप्रीया सुळे म्हणाल्या की, "सत्यमेव जयते. सत्याचा विजय होईलच. हा काळ संघर्षाचा आहे. त्यामुळे आव्हानं येत राहतील. पण आव्हानांवर मात करुन संघर्ष करु आणि सत्याच्याच मार्गाने चालू हा कैलासवासी यशवंतराव चव्हाण यांचा विचार आहे. गेली सहा दशके हा वारसा पुढे न्यायचं काम पवार साहेबांनी केलं आहे आणि त्याच महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी आज ही आमची लढाई आहे,” असेही त्या म्हणाल्या.

हिसाब तो देना पड़ेगा!
घोटाळे ठाकरे सरकारची ईडीद्वारे चौकशी सुरु आहे. रोहित पवार आलेत तर रवींद्र वायकर केव्हा येणार? असा सवाल भाजप नेते किरीट सोमय्यांनी केला आहे. तसेच 'हिसाब तो देना पड़ेगा!' असा टोलाही त्यांनी लगावला आहे.



Powered By Sangraha 9.0