कर्तव्यपथावर महाराष्ट्राचा चित्ररथ दाखल! 'ही' असेल यंदाची थीम

24 Jan 2024 14:53:43

Kartavyapath


नवी दिल्ली :
दिल्लीतील कर्तव्यपथावर महाराष्ट्र राज्याचा चित्ररथ दाखल झाला असून हा चित्ररथ विशेष आकर्षण ठरणार आहे. यावर्षीच्या चित्ररथावर छत्रपती शिवाजी महाराजांची थीम आहे. या चित्ररथावर राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमुद्रेचा समावेश करण्यात आला आहे.
 
छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याला ३५० वर्षे पुर्ण झाल्याच्या निमित्ताने यावर्षीच्या चित्ररथाची ही थीम निश्चित करण्यात आहे. दरवर्षी, प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी राजधानी दिल्लीतील कर्तव्यपथावर प्रत्येक राज्याचा चित्ररथ दाखवण्यात येत असतो. त्यासाठी विशेष थीमही निश्चित केली जाते. दरम्यान, यावर्षीचा चित्ररथ कर्तव्यपथावर दाखल झाला असून यावर छत्रपती शिवाजी महाराज ही थीम आहे.

Powered By Sangraha 9.0