नवी दिल्ली : भारतीय अंतराळ संशोधन संस्था(इस्रो)च्या इस्त्रोच्या हैदराबादस्थित नॅशनल रिमोट सेन्सिंग सेंटरने अयोध्येत बांधल्या जाणाऱ्या राम मंदिराची उपग्रह प्रतिमा प्रसिद्ध केली आहे. या फोटोच्या माध्यमातून राम मंदिरानजीकचा परिसर शरयू नदी, दशरथ महालदेखील चित्रांमध्ये दिसत आहे.
दरम्यान, 'इस्त्रो'च्या हैदराबादस्थित नॅशनल रिमोट सेन्सिंग सेंटरने अयोध्येत बांधल्या जाणाऱ्या राम मंदिराची उपग्रह प्रतिमा प्रसिद्ध केली असून इस्रोने जारी केलेल्या छायाचित्रात २.७ एकरमध्ये पसरलेले राम मंदिर स्पष्टपणे दिसत आहे. अयोध्येत निर्माण होत असलेल्या राम मंदिराची ही छायाचित्रे गेल्या वर्षी १६ डिसेंबर रोजी घेण्यात आली होती.