राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणात 'या' उमेदवारांना नोेकरीची सुवर्णसंधी; जाणून घ्या कसा करायचा अर्ज

22 Jan 2024 17:17:48
National Highways Authority of India Recruitment 2024

मुंबई :
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणात नवीन भरती केली जाणार आहे. या भरतीसंदर्भात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून नोकरीची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणांतर्गत होणाऱ्या नोकरभरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.


पदाचे नाव - 

उप- व्यवस्थापक (६० जागा)


शैक्षणिक पात्रता -

मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थातून सिव्हिल अभियांत्रिकी शाखेतील पदवीधारक


वयोमर्यादा -

१८ ते ३० वर्षे


वेतनश्रेणी -

१५,६०० ते ३९,१०० रुपये.


भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणांतर्गत भरतीसाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावयाचा आहे.

अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत दि. १५ फेब्रुवारी २०२४ असणार आहे.


भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण भरतीची जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा

'भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण'च्या अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा

Powered By Sangraha 9.0