रामललाची मूर्ती घडविणाऱ्या अरुण योगीराज यांनाही पार करावं लागलं अग्निदिव्य

20 Jan 2024 17:03:19

Arun Yogiraj

( Image Credit -  Arun Yogiraj X post)

नवी दिल्ली : अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा सोमवार, दि. २२ जानेवारी रोजी प्रस्तावित होता. मात्र, त्यापूर्वीच सोशल मीडियावर रामललाची प्रतिमा सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर रामभक्त भावूक झाले. त्यानंतर पाचशे वर्षांचा संघर्ष आणि बलिदानानंतर रामललाचं असं रुप पाहून अनेकांना आपले अश्रू अनावर झाले होते. या प्रतिमेला कृष्णशिलेतून साकारणाऱ्या कर्नाटकच्या मूर्तीकार अरुण योगीराज यांच्या शिल्पकलेचं कौतूक केलं जात होतं.



अरुण योगीराज म्हैसूरचे राहणारे आहेत. उत्तराखंड स्थित केदारनाथ धाममध्ये जगद्गुरु शंकराचार्यांची जी प्रतिमा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हे अनावरण केली ती त्यांनीच तयार केली होती. इतकेच नव्हे तर दिल्लीतील इंडिया गेटवर पंतप्रधानांनी अनावरण केलेल्या सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्याचे अनावरण केले हा पुतळाही योगीराज यांनीच साकारला होता. आता त्यांनीच साकारलेली मूर्तीही राम मंदिर गर्भगृहात स्थापित करण्यात आली आहे. या प्रतिमेला साकारण्यासाठीही एक तपश्चर्या करावी लागली होती. ही संपूर्ण प्रतिमा साकारताना केवळ सात्विक आहारच त्यांनी ग्रहण केला होता. एकाकाळात तर त्यांच्या डोळ्याला जखमही झाली होती.

अयोध्येतील रामलला साकार करणे हे दिव्य कार्य त्यांना पार पाडायचे होते. मात्र, ही मूर्ती सर्वोत्कृष्ट असावी, असा पण त्यांनी केला होता. ही मूर्ती साकारण्यासाठी तब्बल सहा महिन्यांचा कालावधी लागला. ही मूर्ती साकारताना पूर्ण सहा महिने कुटूंबाला भेटलेही नाहीत. अयोध्येत कुलदैवताचे स्मरण करून दिवसाची सुरुवात करतात. त्यानंतर तेथील पंडितांशी पूजा-अर्चना करायचे. रामकथेतील विद्वान त्यांची मदत करायचे. रामलला कसे दिसत? त्यांचं वर्णन काय असेल? हे बारकावे यानिमित्त ते टीपत असायचे. मूर्ती घडवत असताना त्यांच्या डोळ्याला जखमही झाले. त्यांच्या डोळ्यात एक टोकेरी दगड त्यांच्या डोळ्यात गेला.




या घटनेनंतर त्यांचे शस्त्रक्रीया पार पडली. कित्येक दिवस एन्टीबायोटिक आणि पेनकिलर्सचे डोस घेण्यास डॉक्टरांनी सांगितले होते. पण म्हणतात ना देव तारी त्याला कोण मारी या म्हणीप्रमाणे ते बरेही झाले आणि पुन्हा जोमाने कामाला लागले. रामललाची भव्य प्रतिमा तयार होण्यात आता कुठलीही बाधा येणार नव्हती. त्यांची पत्नी विजेता यांनी ‘न्यू इंडियन एक्सप्रेस’ला दिलेल्या मुलाखतीत ही माहिती दिली होती.





अरुण योगीराज २००८ में म्हैसूर विद्यापीठातून त्यांनी एमबीएधारक होते. त्यानंतर एक खासगी नोकरी केली. मात्र, काहीकाळानंतर त्यांनी नोकरी सोडत पारंपारिक व्यावसायाकडे आपला मोर्चा वळवला. मैसूरच्या गुज्जे गौदाना पुरातून एका ठिकाणाहून पाषाण मागवले आहेत. त्यातून प्रभू श्रीरामाची मूर्ती घडवण्यात आली आहे. दक्षिण भारतातील सर्वात प्राचीन पाषाणांपैकी एक असे पाषाण मानले जाते.

Powered By Sangraha 9.0