चेन्नई : "आमच्या नेत्याने म्हटल्याप्रमाणे धर्म आणि राजकारण यांची सांगड घालू नका. आम्ही कोणत्याही मंदिर बांधण्याच्या विरोधात नाही, पण त्या ठिकाणी मंदिर बांधण्यास आमचा पाठिंबा नाही. जिथे एक मशीद पाडण्यात आली." असे वादग्रस्त विधान स्टॅलिनपुत्र आणि द्रमुक नेते उदयनिधी स्टॅलिन यांनी केले आहे.
उदयनिधी त्यांच्या सनातनविरोधी वक्तव्यांसाठी प्रसिद्ध आहेत. गेल्या वर्षी त्यांनी सनातन धर्माची तुलना डेंग्यू आणि कोरोना व्हायरसशी केली होती. उदयनिधी म्हणाले होते की, सनातन धर्म हा डेंग्यू, मलेरिया आणि कोरोनासारखा आहे, ज्याचा नुसता विरोध होऊ शकत नाही, तर त्याचा नायनाट करण्याची गरज आहे."
सनातनविरोधी वक्तव्यानंतर आता उदयनिधी स्टॅलिन यांनी राम मंदिराविषयी वादग्रस्त विधान केले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.