अयोध्या यात्रा होणार आणखी सुकर; भाविकांसाठी 'होली अयोध्या' App झाले लाँच; पाहा काय आहेत वैशिष्ट्ये

15 Jan 2024 19:33:46
holy ayodhya app
 
लखनौ: उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी रविवारी १४ जानेवारीला अयोध्येत पर्यटनाशी संबंधी मोबाईल ऍप्लिकेशन लाँच केले आहे. या App मुळे राममंदारात य़ेणाऱ्या भाविकांसाठी आहे. या अॅपला 'होली अयोध्या' असे नाव देण्यात आले आहे.
 
या Appमध्ये अयोध्येतील प्रमुख ठिकाणांची माहिती, नकाशे, वाहतूक व्यवस्था, निवास व्यवस्था यासह अनेक सुविधा उपलब्ध होणार आहेत. हे App अयोध्या विकास प्राधिकरणाने अयोध्येत येणाऱ्या भाविकांना समर्पित केले आहे. योगी सरकार अयोध्येला जागतिक पर्यटन शहर म्हणून स्थापित करण्यासाठी प्रयत्नशिल आहे. जगभरातून येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षात घेऊन हे App सर्व प्रकारच्या सुविधांसाठी एकच व्यासपीठ म्हणून विकसित करण्यात आले आहे.
 
अयोध्या विकास प्राधिकरणाचे उपाध्यक्ष विशाल सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार हे मोबाईल अॅप्लिकेशन अयोध्या शहरात पर्यटकांना त्यांच्या आगमनापासून ते त्यांच्या मुक्कामापर्यंतच्या सर्व गरजा पुरवेल. ज्यामध्ये मुक्कामासाठी होम स्टे, पर्यटनासाठी प्रदूषणमुक्त इलेक्ट्रॉनिक कार, शहर विकासकंपनीने प्रदान केलेल्या इलेक्ट्रॉनिक बसेस, गोल्फ कार्ट्स, हॉप ऑन हॉप ऑफ व्हेइकल्स, व्हील चेअर्स, स्थानिक मान्यताप्राप्त आणि प्रशिक्षित पर्यटक मार्गदर्शक इत्यादींच्या मार्गाची स्थिती, ऑपरेटिंग वेळा आणि ऑनलाइन तिकीट बुकिंगची सुविधा यांचा समावेश आहे.
 
या अॅप्लिकेशन मधील माहीती भारताच्या सर्व २२ अधिकृत भाषांमध्ये उपलब्ध असणार आहे. या अॅपमध्ये उपलब्ध असलेली थ्रीडी मॅप सेवा भविष्यात शहरातील पायाभूत सुविधांमध्ये होणारे बदल दाखवण्यास सक्षम असेल.
 
 
Powered By Sangraha 9.0