"माझ्या स्वप्नात राम आले होते, अयोध्येत येणार नाहीत.", तेज प्रताप यादव बरळले

15 Jan 2024 18:01:02
 TEJPRATAP
 
पाटणा : "भगवान राम २२ जानेवारीला अयोध्येत येणार नाहीत. राम माझ्या स्वप्नात आला होता" असे वादग्रस्त विधान आरजेडी प्रमुख लालू यादव यांचा मोठा मुलगा आणि बिहार सरकारमधील मंत्री तेज प्रताप यादव यांनी केले आहे. बिहारमध्ये सत्ताधारी पक्षाकडून राम मंदिरावरुन राजकारण सुरु आहे. नेत्यांची वादग्रस्त विधानेही सुरूच आहेत. या दरम्यान लालू यादव यांचा मोठा मुलगा तेज प्रताप यादव यांनी सुद्धा वादग्रस्त विधान केले आहे.
 
प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना तेज प्रताप यादव म्हणाले की,"अयोध्येत रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावेळी राम येणार नाही. ते माझ्या स्वप्नात आले होते. याआधी सुद्धा तेज प्रताप यादव यांनी असाच दावा श्रीकृष्णाविषयी देखील केला होता. त्यावेळी देखील श्रीकृष्णाने आपल्याला झोपेत असताना दिव्य रुपात दर्शन दिल्याचा दावा तेजप्रताप यादव यांनी केला होता.
 
 
Powered By Sangraha 9.0