मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीने तयारी सुरु केली आहे. रविवारी राज्यभरात महायुतीचे मेळावे आयोजित करण्यात आले आहेत. २५ मंत्री आणि ५२ प्रमुख नेत्यांना या मेळाव्याची जबाबदारी देण्यात आली आहे. महायुतीतील सर्व घटक पक्षांना एकसंघ ठेवण्याच्या उद्देशाने हे मेळावे आयोजित करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
रविवार, १४ जानेवारी रोजी राज्यभरातील सर्व जिल्ह्यांमध्ये महायुतीचे मेळावे होणार आहेत. या मेळाव्यांद्वारे शक्तीप्रदर्शन करून विरोधकांना आव्हान दिले जाणा आहे. २५ मंत्र्यांसह ५२ प्रमुख नेत्यांवर या मेळाव्याची जबाबदारी सोपवण्यात आली असून त्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत -
मुंबई - दीपक केसरकर, आशिष शेलार, राहुल शेवाळे, अविनाश महातेकर, सचिन खरात, सिद्धार्थ कासारे
मुंबई उपनगर - आशिष शेलार, छगन भुजबळ, गजानन कीर्तीकर, रामदास कदम
ठाणे - श्रीकांत शिंदे
पुणे - रामराजे नाईक-निंबाळकर, आमदार प्रसाद लाड
नागपूर - चित्रा वाघ, जयदीप कवाडे
अमरावती - बच्चू कडू, अनिल बोंडे, रवी राणा
भंडारा - विजयकुमार गावित
गडचिरोली - सुबोध मोहिते
अकोला - प्रवीण दरेकर
वर्धा - दीपक सावंत
चंद्रपूर - सुधीर मुनगंटीवार
गोंदिया - धर्मरावबाबा अत्राम
छत्रपती संभाजीनगर - संदिपान भुमरे
अहमदनगर - राधाकृष्ण विखे-पाटील
बीड - धनंजय मुंडे, तानाजीराव शिंदे
जालना - अतुल सावे
सातारा - शंभूराज देसाई
सोलापूर - चंद्रकांत पाटील
लातूर - संभाजी निलंगेकर-पाटील
धाराशिव - तानाजी सावंत
कोल्हापूर - हसन मुश्रीफ
परभणी - संजय बनसोडे
धुळे - गिरीश महाजन
नंदुरबार - अनिल भाईदास पाटील
पालघर - रवींद्र चव्हाण, हितेंद्र ठाकूर
सिंधुदुर्ग - आदिती तटकरे
हिंगोली - अब्दुल सत्तार