पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिकच्या काळाराम मंदिरात!

12 Jan 2024 12:04:15

kalaram mandir modi
 
नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदी १२ जानेवारीला महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. महाराष्ट्रात अनेक विकास कामांच लोकार्पण ते करणार आहेत. सकाळी सुरुवातीला नाशिक आणि दुपारी नवी मुंबई चा दौरा ते करणार आहेत. पंतप्रधान सकाळी नाशिक येथे पोहोचले आहेत.
 
नाशिकमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रामकुंड येथे गोदावरी पुजा केली व त्यानंतर त्यांनी काळाराम मंदीराकडे रवाना झाले आहेत. काळाराम मंदीरात त्यांच्या हस्ते प्रभू रामचंद्रांची पुजा केली जात आहे. त्याचबरोबर श्रीरामांचा अभिषेकही केला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यानंतर मंदिरात अनेक साधू, संत मंडळींशी चर्चा करणार आहेत.


kalaram mandir modi
  
काळाराम मंदीरात दर्शन घेऊन मग पंतप्रधान सभा स्थळी जातील. नाशिक मध्ये येताच नरेंद्र मोदीनी तेथे रोडशो केला, त्यावेळी त्यांच्यासोबत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते. नाशिकमध्ये सभेला संबोधित करुन पंतप्रधान मोदी मुंबई कडे रवाना होतील. तेथे ते अटल सेतु म्हणजेच शिवडी न्हावा-शेवा सागरी सेतुचे उद्घाटन करणार आहेत.
 
 
Powered By Sangraha 9.0