मराठीत नेपोटिझम येऊच शकत नाही – विजय पाटकर

10 Jan 2024 18:00:43

nepotism 
 
रसिका शिंदे-पॉल
 
मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टी सध्या बायोपिक, सिक्वेल किंवा प्रिक्वेल यावरच तग धरुन आहे. विविध आशय किंवा विषय हाताळण्याचे कसब कुठेतरी हिंदीतील दिग्दर्शक किंवा कलाकारांच्या हातून निसटत चालल्याचे दिसून येत आहेत. याशिवाय हिंदीत नेपोटिझम मोठ्या प्रमाणात होत चालले आहे असेही दिसून येते. आपल्या मुलीला किंवा मुलाला अभिनयाचा किंवा दिग्दर्शनाचा गंध नसला तरीही त्यांना चित्रपटांतून संधी दिल्या जात आहेत. परंतु, मराठीत नेपोटिझमचे चित्र दिसून येते का? असा प्रश्न अभिनेते विजय पाटकर यांना विचारला असता त्यांनी ‘मराठीत नेपोटिझम येऊच शकत नाही’ असे ठामपणे ‘महाएमटीबी’शी बोलताना सांगितले.
 
काय म्हणाले विजय पाटकर?
 
“मराठीत नेपोटिझम येण्यासाठी आधी तुमचे वडिल मोठे असले पाहिजे. केवळ पैसा असला म्हणून नेपोटिझम होत नाही. हिंदी चित्रपटसृष्टीत पाहिलत तर तिथे राज कपूर, ऋषि कपूर होते. पण मराठीत वडिलांनाच कुणी ओळखत नसेल तर मुलाला कोण ओळखणार? तसेच, जे नवे निर्माते मराठीत येतात ते आपल्या मुलांना लॉंच करणारच”. पुढे उदाहरण देत विजय पाटकर म्हणाले, “सचिन पिळगांवकर यांची मुलगी श्रिया पिळगांवकर तिच्या पायांवर उभी आहे. महेश मांजरेकर यांचा मुलगा देखील आपल्या कलागुणांची ओळख करुन काम करत आहेत. प्रत्येकाचे वडिल २-३ कोटी पैसे खर्च करुन मुलांसाठी चित्रपट बनवावा इतके सक्षम नाही आहेत. त्यामुळे मराठीत नेपोटिझम येऊच शकत नाही”, असे ठाम मत विजय पाटकर यांनी मांडले.
 
 
 
Powered By Sangraha 9.0