अहमदनगर : उबाठा गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज (८ सप्टें.) अहमदनगर जिल्ह्याच्या दुष्काळी भागात पाहणी दौऱ्यासाठी पोहोचले आहेत. यावेळी त्यांच्यासोबत खासदार संजय राऊत आहेत. राज्यात झालेल्या कमी पावसामुळे शेतकऱ्यांवर मोठं संकट ओढावलं आहे. शेतकऱ्यांच्या समस्या जाणुन घेण्यासाठी उद्धव ठाकरे बांधावर गेले आहेत. उद्धव ठाकरेंनी अहमदनगरच्या काकडी येथे दुष्काळग्रस्त भागाची पाहणी केली.
ठाकरेंनी शेतकऱ्यांशी संवाद साधुन त्यांच्या समस्या जाणुन घेतल्या. आमच्याकडे दुर्लक्ष होत असल्याचं शेतकरी यावेळी म्हणाले. आम्हाला न्याय मिळवुन द्या. सगळं गेलं आता पाऊस पडुनही उपयोग नाही. शेतीचे पंचनामे होऊन देखील मदत नाही. अशी समस्या शेतकऱ्यांनी ठाकरेंकडे मांडली.