घाटकोपरमध्ये राम कदमांनी केलं ढोलताशाच्या गजरात गोविंदांचे स्वागत
07-Sep-2023
Total Views |
मुंबई : आज दहीहंडीच्या निमित्ताने राज्यात सर्वत्र उत्साहाचे वातावरण दिसत आहे. ठाणे, मुंबई सह उपनगरात अनेक ठिकाणी गोविंदांचा 'बोल बजरंग बली की जय' असा एकच जोश दिसून येतोय. तसेच आज वरुणराजाने उत्सवाला हजेरी लाऊन गोविंदांचा उत्साह अजून वाढवला आहे.
अनेक दहीहंडींप्रमाणे आकर्षकबिंदु ठरलेली एक महत्वाची म्हणजेच 'भारतातील सर्वात मोठी दहीहंडी' म्हणून प्रसिद्ध असलेली राम कदम यांनी आयोजित केलेली घाटकोपर पश्चिम येथील दहीहंडी. गेल्या अनेक वर्षापासून या दहीहंडीचे आयोजन केले जाते. अनेक गोविंद पथक मोठ्या उत्साहाने येथे हजेरी लावतात.
यावर्षी या दहीहंडीची सुरुवात ढोलताशाच्या ठेक्याने आणि अभंगाच्या गजरात झाली. घाटकोपरच्या 'नवश्री' ढोलताशा पथकाने ढोल वादन करून दहीहंडी कार्यक्रमाची सुरुवात केली. यानंतर एका वारकरी संप्रदायाने ही अभंगाचे सूर आळवून कार्यक्रमाच्या सुरूवातील रंगत वाढवली.
दरम्यान, राम कदम यांनी दहीहंडीची पूजा करून वेगवेगळ्या पथकांनी थर लावण्यास सुरुवात केली. अशाप्रकारे महाराष्ट्राच्या संस्कृती दर्शनाने या दहीहंडीची सुरुवात झाली.
"राम कदम आयोजित भारतातील सर्वात मोठ्या दहीहंडीमध्ये पहिल्यांदा ढोलताश वादन करायला मिळाल्यामुळे आम्हाला खूप आनंद झाला आहे."
- नवश्री ढोलताशा पथक
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.