TCIL Recruitment 2023 : विविध पदांकरिता आजच अर्ज करा

07 Sep 2023 16:49:02
Telecommunication Consultants India Limited Recruitment 2023

मुंबई :
'टेलिकम्युनिकेशन कन्सल्टंट इंडिया लिमिटेड' (टीसीआयएल) मधील विविध रिक्त पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. टीसीआयएलमधील रिक्त जागांसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून दि. ०४ सप्टेंबर २०२३ पासून अधिसूचना जारी करण्यात आली आहे.

दरम्यान, टीसीआयएलमधील इलेक्ट्रिकल इंजिनियरींगसाठी उप महाव्यवस्थापक (ई5), संयुक्त महाव्यवस्थापक(ई6), महाव्यवस्थापक, महाव्यवस्थापक (ई7) ही सर्व पदे भरली जाणार आहे. यासर्व पदांसाठी रिक्त असलेली ०१ जागा या भरतीच्या माध्यमातून भरली जाणार आहे.

या भरतीसाठी अर्ज करण्याकरिता दि. २७ सप्टेंबर २०२३ ही अंतिम मुदत असणार आहे. तसेच, भरतीबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी टीसीआयएलच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.



Powered By Sangraha 9.0