भाजप नेते किरीट सोमय्या व्हिडीओ प्रकरण; लोकशाही चॅनलच्या संपादकावर गुन्हा दाखल!

06 Sep 2023 10:56:41
Kirit Somaiya Viral Video case

मुंबई
: माजी खासदार किरीट सोमय्या व्हिडीओ प्रकरणात लोकशाही चॅनलचे संपादक कमलेश सुतार आणि अनिल थत्ते यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई पोलिसांच्या वतीने भारतीय दंड संहितेच्या कलम 500 (मानहानी) आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम 66 (ई) आणि 67 (ए) अंतर्गत गुन्हा दाखल केला.

तसेच दि. ५ सप्टेंबर रोजी किरीट सोमय्या यांनी या प्रकरणी आपला जबाब दिल्यानंतर या प्रकरणाच्या तपासाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आणि रात्री उशिरा लोकशाही चॅनलच्या संपादकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकशाही या मराठी वृत्तवाहिनीने १७ जुलै रोजी किरीट सोमय्यांची एक व्हिडिओ प्रसारमाध्यामांवर प्रसिद्ध केली होती. दरम्यान विधानसभेत ही त्या प्रकरणाचे पडसाद उमटले. अंबादास दानवे यांनी किरीट सोमय्या यांच्या व्हिडीओ क्लिप्स असलेला पेनड्राईव्ह सभापती नीलम गोऱ्हे यांच्याकडे सुपूर्द केला. यानंतर राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची घोषणा केली होती.
 
दरम्यान आता गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीसांना सहकार्य करत राहू. आणि जनतेची भूमिका आणि प्रश्न मांडण्याचे काम करत राहू, अशा आशयाचे ट्विट कमलेश सुतार यांनी केले आहे.
 
Powered By Sangraha 9.0