जिल्हा विद्युत समन्वय व सनियंत्रण समिती तर्फे महावितरण पेण मंडळाची रायगड जिल्हा आढावा बैठक
05 Sep 2023 19:26:21
मुंबई:केंद्र शासनाकडून राज्यातील विद्युत प्रणाली बळकटीकरणासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती देण्याबाबत जिल्हा विद्युत समिती, अलिबाग-रायगड यांची बैठक नुकतीच घेण्यात आली. समितीचे आयोजक व भांडूप परिमंडलचे मुख्य अभियंता सुनिल काकडे तसेच पेण मंडळाचे अधीक्षक अभियंता इब्राहीम मुलाणी सोबत समितीचे अध्यक्ष व खासदार मावळ मतदारसंघ, श्रीरंग बारणे, सह अध्यक्ष व खासदार लोकसभा सदस्य रायगड, सुनिल तटकरे, सदस्य सचिव व जिल्हाअधिकारी अलिबाग-रायगड, डॉ.योगेश म्हसे, समिती सदस्य व विधानसभा सदस्य महाड, भरतशेठ गोगावने, समिती सदस्य व विधानसभा सदस्य अलिबाग महेंद्र दळवी उपस्थित होते.
रायगड जिल्ह्यामध्ये केंद्र शासनाच्या पूर्णत्वास आलेले प्रकल्प उदा. दीनदयाळ उपाध्याय ग्रामज्योती योजना, इंटिग्रेटेड पॉवर डेव्हलपमेंट स्कीम, एसएसएमआर तसेच एनसीआरएमपी-२ (राष्ट्रीय चक्रीवादळ आपत्ती सौमीकरण योजना) तसेच प्रस्तावित कोकण आपत्ती सौमीकरण योजना बाबत माहिती दिली तद नंतर केंद्र शासनाच्या निधी अंतर्गत प्रस्तावित आरडीएसएस (सुधारित वितरण क्षेत्रीय योजना) बाबतच्या आधुनिकीकरण / वितरण हानी कमी करणे / फिडर वेगळे करणे इत्यादी माहितीचे संगणकीय माहितीचे सादरीकरण करण्यात आले. यामध्ये सन्मानिय समिती सदस्यांनी सूचना दिल्या की, केंद्र शासनाच्या विविध ग्राहकाभिमुख योजनांची अंमलबजावणी नियोजित केलेल्या वेळेत पूर्ण करावेत. सन्मानिय समिती सदस्यांनी दिलेल्या इतर सूचनांची नोंद महावितरणने घेतली.
अशाप्रकारे अलिबाग-रायगड जिल्हयाअंतर्गत चालू असलेल्या व प्रस्तावित केंद्र शासनाच्या विविध योजनेची माहिती समितीस महावितरण पेण मंडळाकडून देण्यात आली.