गणेशोत्सव मंडळांना टाटा देणार 'पॉवर'!

    05-Sep-2023
Total Views |
tata power


मुंबई : गणेश मंडळांनी अधिकृत वीजजोडणी घ्यावी, असे आवाहन टाटा पॉवरने केले आहे. अधिकृत कनेक्शन घेण्यासाठी टाटा पॉवरने गणेश मंडळांशी आधीच संपर्क साधला आहे. गेल्या वर्षी १८० गणेश मंडळांना नवीन कनेक्शन दिली होती

टाटा पॉवर किमान कागदपत्रांसह तात्पुरत्या स्वरूपात गणेश मंडळांना वीजजोडणी देणार असून निवासी शुल्क श्रेणीतील दर आकारणार आहे. गणेश मंडळे टाटा पॉवर ग्राहक पोर्टलद्वारे ऑनलाईन अर्ज करू शकतात. याव्यतिरिक्त कस्टमर रिलेशन्स सेंटरकडे ओळखीचा पुरावा, मालकीचा पुरावा, मुंबई महापालिकेचे ना-हरकत प्रमाणपत्र आणि चाचणी अहवाल यासारख्या किमान कागदपत्रांसह संपर्क साधू शकतात.

मागील वर्षी कंपनीने सर्व गणेश मंडळांपर्यंत पोहोचून १५० हून अधिक जागरुकता सत्रे आयोजित केली होती. गणेश मंडळांना भेट देणाऱ्या सर्व भाविकांच्या सुरक्षेसाठी या वर्षीही अशाच प्रकारच्या उपक्रमांचे नियोजन करण्यात येणार आहे. सणासुदीच्या काळात विविध सोशल मीडियाच्या माध्यमातून सुरक्षेबाबत जनजागृती करण्याची टाटा पॉवरची योजना आहे.
 
जे ग्राहक नवीन कनेक्शनसाठी अर्ज करतात त्यांना आम्ही या उत्पादनांबाबत माहिती देतो. गेल्या वर्षी आम्ही अशा प्रकारची उत्पादने ५५ पेक्षा जास्त गणेश मंडळांमध्ये प्रदर्शित केली होती. या व्यतिरिक्त टाटा पॉवरने सामान्य जनतेला वापराचे प्रात्यक्षिक दाखविण्यासाठी आणि शाश्वत वातावरण निर्माण करतानाच त्यांना ग्रीन इलेक्ट्रिक वाहने घेण्यास प्रोत्साहित करण्यासाठी ईव्ही चार्जर बसवले आहेत.
 
युनिट          दर                                                                 
0-100        3.34 रुपये प्रति युनिट                                             
 
101-300     5.89 रुपये प्रति युनिट                                                                            
301-500    9.34 रुपये प्रति युनिट                                                                         
500 हून अधिक 10.4 रुपये प्रति युनिट  

      
              
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.