'इंडिया नव्हे भारत...', राष्ट्रपतींनी दिले संकेत!

05 Sep 2023 13:09:24
 President
 
नवी दिल्ली : ९ आणि १० सप्टेंबर रोजी दिल्लीत होणाऱ्या जी-२० शिखर परिषद होणार आहे. या परिषदेचे आमंत्रण जगभरातील ४० राष्ट्रप्रमुखांना देण्यात आले आहे. दरम्यान, ९ सप्टेंबर रोजी राष्ट्रपती भवनात होणाऱ्या जी-२० डिनरच्या निमंत्रण पत्रात राष्ट्रपतींचा उल्लेख 'इंडिया'च्या राष्ट्रपती ऐवजी 'भारता'च्या राष्ट्रपती (प्रेसिडेंट ऑफ भारत) असा केला आहे.
 
 
भारत देशाला इंडिया या नावाने सुद्धा ओळखले जाते. देशाचे एकच नाव असावे आणि ते नाव भारत असावे, अशी मागणी अनेक वर्षांपासून होत आहे. त्यातच आता जी-२० शिखर परिषदेच्या निमंत्रण पत्रावर इंडिया ऐवजी भारत लिहिल्यामुळे पुन्हा एकदा चर्चेला उधाण आले आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0