मुंबई : स्पेन आर्ट फेस्टिवलमध्ये भारतीय तरुणाने रेखलेली रांगोळी रसिकांचे लक्ष वेधून घेत आहे. जूचंद्र हे वसईजवळील नायगाव पूर्वेचे छोटेसे खेडेगाव. या गावातील सर्वच लोक कलाकार. चित्रकारी आणि रांगोळी तर घराघरातील सर्वांसाठी अगदी डाव्याहाताचा मळ. याच गावातील संजय पाटील नामक तरुणाने फ्रेंच च्या आर्ट फेस्टिवलतही भारताच्या इस्रोच्या विजयदाखवणारी रांगोळी रेखली आहे. अतिशय सुंदर अशा रांगोळीकडे लक्ष वेधलं गेल्याने त्यावरील इसरोच्या चित्राच्या माध्यमातून भारताच्या अवकाश यशाकडे लोक कुतूहलाने पाहत आहेत.
या कला महोत्सवात आपल्या देशातिलेकून १३ कलाकारांनी आपली कला सादर केली होती. संजय यांच्या रांगोळीबाबत सांगायचे झाल्यास या कलाकृतीची लांबी १० फूट आहे तर रुंदीही १० फूट इतकीच आहे. मध्यावर निळ्या आकाशातील चंद्रयानाच्या उदा असलेले चित्र व त्यावर इसरॉचा लोगो आहे व बाहेर कमलदलाच्या पाकळ्यांच्या आकारात विविध रंग भरले आहेत.