मुंबई : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) मुंबई येथील रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यास सुरुवात झाली आहे. या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना अर्ज
ऑनलाईन पद्धतीने करता येणार आहे. या भरतीच्या माध्यमातून तरुणांना नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे.
'एमआयडीसी' मुंबई अंतर्गत गट अ, ब आणि क संवर्गातील रिक्त पदांसाठी भरती सुरू आहे. या भरती अंतर्गत ८०२ पदे भरण्यात येणार असून मुंबईकरांसाठी ही नोकरीची मोठी संधी असणार आहे. अर्ज करण्याची अंतिम मुदत दि. २५ सप्टेंबर, २०२३ असणार आहे.
रिक्त पदांचा तपशील पुढीलप्रमाणे :-
गट 'अ' मधील कार्यकारी अभियंता (स्थापत्य) - ३, उप अभियंता (स्थापत्य) - १३, उप अभियंता (विद्युत / यांत्रिकी) - ३, सहयोगी रचनाकार - २, उप रचनाकार - २, उप मुख्य लेखा अधिकारी - २ ही रिक्त पदे भरली जाणार आहेत.
गट 'ब' मधील सहाय्यक अभियंता (स्थापत्य) - १०७, सहाय्यक अभियंता (विद्युत यांत्रिकी) - २१, सहाय्यक रचनाकार - ७, सहाय्यक वास्तुशास्त्रज्ञ - २, लेखा अधिकारी - ३, क्षेत्र व्यवस्थापक - ८ ही रिक्त पदे भरली जाणार आहेत.
गट 'क' मधील कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) - १७, कनिष्ठ अभियंता (विद्युत / यांत्रिकी) - २, लघुलेखक (उच्च श्रेणी) - १४, लघुलेखक (निम्न श्रेणी) - २०, लघुटंकलेखक - ७, सहाय्यक - ३, लिपिक टंकलेखक - ६६, वरिष्ठ लेखापाल - ६, तांत्रिक सहाय्यक (श्रेणी-२) - ३२, वीजतंत्री (श्रेणी-२) - १८, पंपचालक (श्रेणी-२) - १०३, जोडारी (श्रेणी-२) - ३४, सहाय्यक आरेखक - ९, अनुरेखक - ४९ ही सर्व रिक्त पदे भरतीप्रक्रियेतून भरली जाणार आहे.
दरम्यान, एमआयडीसी अंतर्गत भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी अर्ज शुल्क हे खुल्या प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी १ हजार रुपये अर्ज शुल्क असून मागासवर्गीय/ दिव्यांग उमेदवारांसाठी १०० रुपये शुल्क आकरण्यात येणार आहे.