भारतीय विमानतळ प्राधिकरणात पदभरती; विविध पदांकरिता आजच अर्ज करा

04 Sep 2023 14:59:36
Airports Authority of India Recruitment 2023

मुंबई :
भारतीय विमानतळ प्राधिकरण (एएआय)त मेगाभरती केली जात असून याकरिता इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. भारतीय विमानतळ प्राधिकरणातील विविध रिक्त जागा भरण्यासाठी आज दि. ०४ सप्टेंबर २०२३ शेवटची तारीख असणार आहे. दरम्यान, या प्राधिकरणातील विविध पदांच्या तब्बल ३४२ जागा भरतीप्रक्रियेच्या माध्यमातून भरल्या जाणार आहेत.

दरम्यान, भारतीय विमानतळ प्राधिकरण (एएआय) हवाई क्षेत्रात नागरी विमान वाहतूक पायाभूत सुविधा निर्माण करणे, श्रेणीतमध्ये सुधारणा करणे आदी कामे करते. एएआयमध्ये भरती केली जाणार असून कनिष्ठ कार्यकारी, कनिष्ठ सहाय्यक आणि वरिष्ठ सहाय्यक पदाच्या ३४२ जागा या भरतीच्या माध्यमातून भरल्या जाणार आहेत.

तसेच, उमेदवाराची निवड ऑनलाइन परीक्षा, अर्ज पडताळणी / संगणक साक्षरता चाचणी / शारीरिक मापन आणि सहनशक्ती चाचणी / ड्रायव्हिंग चाचणी (पदासाठी लागू). या मार्फत केली जाणार आहे. भरतीसंदर्भातील अधिक तपशीलासाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

Powered By Sangraha 9.0