तब्बल २३ तासाच्या मिरवणूकीनंतर लालबागच्या राजाचे विसर्जन संपन्न!
29-Sep-2023
Total Views |
मुंबई : अनंत चतुर्दशीच्या दिवशी १० दिवसांच्या गणपतीचे विसर्जन २८ सप्टेंबरला मोठ्या थाटामाटात पार पडले. यावेळी मुंबईसह राज्यभरातील गणेशोत्सव मंडळांनी मिरवणूक काढून बाप्पाला निरोप दिला. तर लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या मुंबईतील लालबागच्या राजाचे विसर्जन तब्बल २३ तासाच्या मिरवणूकीनंतर गिरगांव चौपाटीवर झाले.
अनंत चतुर्दशीच्या दिवशी सकाळी ११:३० च्या सुमारास लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली होती. त्यानंतर मुंबईत ठिकठिकाणी राजाला निरोप देण्यासाठी पुष्पवृष्टी करण्यात आली. या सर्व सोहळ्यानंतर २९ सप्टेंबरला सकाळी आठच्या सुमारास लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवर पोहोचला.
सकाळी समुद्राला ओहोटी असल्यामुळे लालबागचा राजाला विसर्जनसाठी थांबवण्यात आले. मात्र समुद्राला भरती येऊन गेल्यानंतर लालबागचा राजाला विसर्जनासाठी समुद्राकडे मार्गस्थ करण्यात आले. यावेळी 'पुढच्या वर्षी लवकर या...' च्या गजरात भाविकांनी जड अंत:करणाने बाप्पाला निरोप दिला.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.