महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत 'सहाय्यक प्राध्यापक' पदांसाठी भरती; आजच अर्ज करा

27 Sep 2023 15:06:22
Maharashtra Public Service Commission Recruitment 2023

मुंबई :
महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात एमपीएससी अंतर्गत 'सहाय्यक प्राध्यापक' पदांसाठी भरती केली जात आहे. या भरतीप्रक्रियेच्या माध्यमातून इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीच्या माध्मयातून 'सहाय्यक प्राध्यापक' पदांच्या भरतीसाठी अर्ज मागविण्यात येत असून याभरतीसंदर्भात अधिसूचना जारी करण्यात आली आहे.

एमपीएससी अंतर्गत होणाऱ्या 'सहाय्यक प्राध्यापक' पदांच्या भरतीसाठी अर्ज मागविण्यास सुरूवात झाली असून अर्ज करण्याची अंतिम मुदत दि. ०३ ऑक्टोबर २०२३ असणार आहे. तसेच, अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईट mpsc.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या. त्याचबरोबर, अर्ज करणाऱ्या उमेदवारासाठी वयोमर्यादा निश्चित करण्यात आली असून १८ ते ३८ वर्षेदरम्यान, तर संबंधित शैक्षणिक पात्रतेबाबत संबंधित शाखेत प्रथम श्रेणी उत्तीर्ण आणि मास्टर्स डिग्री अनिवार्य असणार आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत होणाऱ्या भरतीसंदर्भातील अधिक तपशील जाणून घेण्यासाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या.


Powered By Sangraha 9.0