सुधीर मुनगंटीवारांचे मोठे विधान म्हणाले,"उद्धव ठाकरे यांनी..."

26 Sep 2023 12:05:55

Uddhav Thackeray & Sudhir Mungantivar


मुंबई :
शिवसेना आमदार अपात्रतेप्रकरणी सोमवारी सुनावणी पार पडली. दरम्यान, ठाकरे आणि शिंदे या दोन्ही गटाकडून आम्हीच खरी शिवसेना असल्याचा दावा करण्यात येत आहे. आमदार अपात्रतेप्रकरणी पुढील सुनावणी १३ ऑक्टोबरला होणार आहे. सगळ्या प्रकरणावर आता भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी वक्तव्य केले आहे.
 
याबाबत बोलताना "ईश्वर कल्याणच करतो. त्यामुळेच आपल्याला ईश्वराचे अस्तित्व मान्य आहे," असे सुधीर मुनगंटीवार म्हणाले. तसेच "उद्धव ठाकरे यांनी २९ जून २०२२ रोजी राजीनामा न देता ३० तारखेला ते विश्वासदर्शक प्रस्तावाला सामोरे गेले असते आणि त्यांनी व्हीप काढला असता तर तांत्रिक दृष्टीकोनातून अनेक प्रश्न जन्माला आले असते. परंतु, त्यांनी राजीनामा दिला आणि त्यामुळे तसे काही प्रश्न उपस्थित होत नाहीत," असे वक्तव्य सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे.
 
दरम्यान, सुप्रीम कोर्टाने आमदार अपात्रतेप्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांच्याकडे जबाबदारी सोपवली असून सोमवारी यासंबंधी सुनावणी पार पडली. यामध्ये ठाकरे गटाकडून सर्व याचिकांवर एकत्र सुनावणी घेण्याची मागणी करण्यात आली.
 
परंतू, शिंदे गटाच्या वकिलांनी या मागणीला विरोध करत प्रत्येक याचिकेवर स्वतंत्र सुनावणीची मागणी केली. विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांनी याबाबतचा निर्णय राखून ठेवला आहे. येत्या १३ ऑक्टोबरला याबाबतची सुनावणी पार पडणार आहे.
Powered By Sangraha 9.0