मुंबई : नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार हे उद्योगपती गौतम अदानी यांच्या अहमदाबाद येथील घरी दाखल झाले आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांनी उधाण आले आहे. ही भेट कशासाठी असेल यासंदर्भात अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.
गौतम अदानी यांच्या घरी एक खाजगी कार्यक्रम आहे. त्यानिमित्ताने शरद पवार त्यांच्याकडे गेले असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, राज्यातील राजकीय परिस्थिती लक्षात घेता या भेटीमागे नेमका कोणता उद्देश आहे, याबद्दल चर्चा रंगल्या आहेत.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फुट पडल्याने राष्ट्रवादीचे शरद पवार आणि अजित पवार असे दोन गट निर्माण झाले आहेत. या दोन्ही गटांकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर दावा सांगण्यात येत आहे. त्यामुळे खरी राष्ट्रवादी कुणाची याबाबतचा निकाल अजून बाकी आहे.
दुसरीकडे, लवकरच शिवसेनेच्या आमदार अपात्रतेसंदर्भात सुनावणी होणार आहे. याबदद्लच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागलेले असताना आता शरद पवारांच्या अदानींच्या घरी दाखल होण्याबद्दलच्या चर्चा रंगल्या आहेत.