योगासनांचे महत्व सांगणारा गणपती बाप्पा आणि उंदीर मामा

20 Sep 2023 18:25:37

yoga ganpati


मुंबई : बदलापुरात योगासने करणारा गणपती असा देखावा असणारा लक्ष वेधून घेतो आहे. सामाजिक संदेश देणारे देखावे सादर करणाऱ्या नरेकर कुटुंबीयांनी यंदा योगाचे महत्त्व सांगणारा देखावा सादर केला आहे. योगाचे महत्व सांगताना गणपती स्वतः पद्मासन घालून बसलेला आहे. तर गणेशाचे वाहन असलेले पाच उंदीर वेगवेगळे आसन करत आहेत.

बदलापुरातील ज्येष्ठ मूर्तिकार रवींद्र कुंभार यांनी. पुठ्ठ्याचा वापर करत पर्यावरणपूरक मूर्ती रवींद्र कुंभार यांनी साकारली आहे. तर व्यंगचित्रकार वासुदेव बोंद्रे यांनी या सर्व मूर्तींचे संकल्पचित्र साकारले आहे. भातुकली खेळणारा गणपती, शेतकरी रूपातील गणपती, पुस्तकं वाचणारा गणपती असे गणपतीच्या विविध रूपातील देखावे यापूर्वी नरेकर कुटुंबीयांनी सादर केले आहेत. त्यासाठी त्यांना राज्यपालांच्या हस्ते गौरवण्यातही आले होते.

सध्या योग साधनेला अनन्यसाधारण महत्व आहे. आपला पारंपरिक योगा आजही फिटनेससाठी सर्वात प्रभावी तंत्र आहे. आजही अनेक सेलिब्रेटींना योगा भुरळ घालतो. त्याचे महत्त्व सर्वांना कळावे यासाठीच हा देखावा सादर केल्याची माहिती पुंडलिक नरेकर यांनी दिली आहे.

ईको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करा, जिंका ५१ हजारांचे बक्षीस!

दैनिक 'मुंबई तरुण भारत' आयोजित MPCB प्रस्तुत 'MahaMTB घरगुती ecofriendly गणेशा' स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सोबत दिलेल्या लिंकवरील गुगल फॉर्म नक्की भरा!

https://bit.ly/3RpZbSq
Powered By Sangraha 9.0