नियमानुसार गणपती बसवणाऱ्या मंडळांसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा!

19 Sep 2023 16:33:20
Eknath Shinde on ganesh chaturthi 2023

मुंबई : गणेशोत्सवाचा आजचा दिवस आनंदाचा दिवस आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाच्या आयुष्यात चांगले दिवस यायला हवे. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गणरायाकडे शुभआशीर्वाद मागितले आहेत. तसेच नियमानुसार गणपती बसवणाऱ्या मंडळांसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा केली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, गेल्या वर्षी आम्ही गणपती उत्सव निर्बंध मुक्त केले आणि सर्व सणांवर बंधन होती ती सगळी दूर करण्यात आलेली आहेत. त्यामुळेच निर्बंध मुक्त वातावरणामध्ये गेल्या वर्षी देखील गणेश भक्तांनी मोठ्या आनंदात उत्साहात गणपती उत्सव साजरा केला. आणि यावर्षी ही निर्बंध मुक्त वातावरणात सण साजरा करू देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
 
त्यामुळेच जे मंडळ वर्षानुवर्ष नियमानुसार गणपती उत्सव साजरा करतात त्यांना यावर्षी सरसकट पाच वर्षाची गणपती बसवण्याची परवानगी द्यावी, त्यांच्याकडून कुठल्याही शुल्क आकारू नये,अशी घोषणा एकनाथ शिंदेंनी केली.

तसेच निर्बंध मुक्त गणेशोत्सव साजरा करावा. कारण ही आपली संस्कृती आहे आपली परंपरा आहे. सण उत्सवामुळे सगळे लोक एकत्र येतात लोकमान्य टिळकांची भूमिका गणपती उत्सव शिवजयंती साजरा करण्याची ती सर्वांनी एकत्र आणण्यासाठी होती. आणि म्हणूनच सर्वांनी एकजुटीने एक दिलाने मनोभावे भक्ती भावे गणरायाची पूजा करावी, असे मत ही शिंदेंनी व्यक्त केले.







Powered By Sangraha 9.0