आता बॉलिवूडमधील अनेक कलाकार ईडीच्या रडारवर!

15 Sep 2023 15:52:17

Mahadev Online Betting App 
 
 
मुंबई : ईडीकडून मुंबईसह विविध राज्यांमध्ये ३९ ठिकाणी छापेमारी करण्यात आली आहे. बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकार ईडीच्या रडारवर आहेत. महादेव ऑनलाइन बेटिंग अॅपशी संबंधित ही छापेमारी करण्यात आली आहे. टायगर श्रॉफ, नेहा कक्कर, सनी लिओनी, कृष्णा अभिषेक, राहत फतेह अली खान यांच्यासह अनेक दिग्गज सेलिब्रिटी ईडीच्या रडारवर आहेत.
 
महादेव ऑनलाईन बेटींग ऍपच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असल्याचा ईडीला संशय होता. याप्रकरणी आता मनी लाँन्ड्रींगचा गुन्हा दाखल करत ईडीने चौकशी सुरु केली आहे. कोलकाता, रायपूर, छत्तीसगड, भोपाळ राज्यात छापेमारी करण्यात आली आहे. या छापेमारीत ईडीने ४१७ कोटी रुपयांपेक्षा अधिक मालमत्ता जप्त केली आहे.
 
महादेव ऑनलाईन बेटींग ऍपच्या माध्यमातून परदेशात काही इव्हेंट आयोजित करण्यात आले होते. इव्हेंटमध्ये संबंधित सेलिब्रिटींना बोलावण्यात आलं होतं. कार्यक्रमासाठी सेलिब्रिटींना मानधन रोख रकमेतून देण्यात आलं होतं. हे सगळे पैसे दोन नंबरचे असल्याचा संशय आहे. या प्रकरणात १४ सेलिब्रिटींची नावे समोर येत आहेत.
 
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0