किशोरी पेडणेकर चौकशीसाठी पुन्हा हजर!

13 Sep 2023 14:45:24

Kishori Pednekar 
 
 
मुंबई : महापालिकेत कोविड काळात मृतदेहाच्या बॅग खरेदी प्रकरणात आर्थिक घोटाळा केल्याप्रकरणी मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्याविरोधात ईडीनं गुन्हा दाखल केला आहे. तर या संदर्भात किशोरी पेडणेकर आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात चौकशीसाठी आज (१३सप्टें) हजर होत्या. २ तास त्यांची चौकशी करण्यात आली.
 
कोविड काळात मुंबई महापालिकेकडून पालिकेच्या रुग्णालयांसाठी मृतदेहांच्या बॅग खरेदी करताना १८०० रुपयांची एक बॅग ६८०० रुपयांना विकत घेतल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. याप्रकरणी पेडणेकर यांच्याविरोधात ईडीनं गुन्हा दाखल केला आहे. पीएमएलए कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0