कोविड काळात वाटलेल्या खिचडीच्या नोंदी नाही!

12 Sep 2023 17:08:55
 
Khichdi Scam
 
 
मुंबई: कोविड काळात गरजूंना वाटलेल्या खिचडीत घोटाळा झाल्याचे पुरावे भाजपा नेते किरीट सोमय्यांनी सादर केले. 4 कोटी खिचडी पाकीट साठी ₹132 कोटींचे पेमेंट मुंबई महापालिकेने 50 कॉन्ट्रॅक्टरना केले, 4 कोटी खिचडी पॅकेट आले मात्र त्याचे कोणतेही पुरावे, कागद पत्र चलन, खिचडीच्या नोंदी नव्हत्या. मग पैसे दिले कसे, असा सवाल उपस्थित करून यात मोठा घोटाळा झाल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे.
 
 
 
किरीट सोमय्या यांनी पालिकेत येत अतिरिक्त आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांची भेट घेतली. या वेळी सोमय्या यांनी खिचडी पुरवठ्याची नोंद आणि कागदपत्रांची मागणी केली; मात्र चिखडी पुरवठ्याची कोणतीही नोंद किंवा कागदपत्रे उपलब्ध नसल्याचे त्यांना सांगण्यात आले. खिचडी घोटाळ्यात अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा हात असून त्यांच्या चौकशीची मागणीही सोमय्या यांनी यावेळी केली.
 
खिचडी घोटाळ्यामध्ये तत्कालीन सहायक आयुक्त डॉ. संगीता हसनाळे यांचा सहभाग असून त्यांच्याविरोधात गुन्हे शाखेकडे गुन्हा दाखल केला आहे. यात आणखी काही तत्कालीन वरिष्ठ अधिकाऱ्यांचा सहभाग असल्याचा संशयही किरीट सोमय्या यांनी व्यक्त केला आहे.
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0