कोल्हापूर सुखावले! राधानगरी धरणाचा एक स्वयंचलित दरवाजा उघडला

10 Sep 2023 13:51:00

radha nagri


मुंबई :
मागील संपूर्ण महिना दडी मारून बसलेला पाऊस गेल्या काही दिवसांपासून पुन्हा सक्रिय झाला आहे. त्यामुळे मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मुसळधार पाऊस झाल्यामुळे महाराष्ट्रातील बळीराजा सुखावला आहे.

पावसामुळे अनेक धरणात मोठ्या प्रमाणात पाणी साठा होण्यास सुरुवात झाली असून अनेक धरणे संपूर्ण क्षमतेने भरली आहेत. कोल्हापूर जिल्हा सुजलाम होण्यात मोठे योगदान असलेल्या राधानगरी तालुक्यातील धरणांचे खूप आहे. राधानगरी तालुक्यात 'राधानगरी', 'दूधगंगा' व 'तुळशी' हे तीन मोठे प्रकल्प आहेत. या तीन प्रकल्पांची पाणी साठवण क्षमता ३७.२२ टीएमसी आहे.

राधानगरी तालुक्यात आतापर्यंत केवळ ३० टक्केच पाऊस झाला होता. परंतु गेल्या २/३ दिवसात झालेल्या मुसळधार पावसामुळे कोल्हापुरात राधानगरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे राधानगरी धरणाचा एक स्वयंचलित दरवाजा खुला झाला आहे.
 
Powered By Sangraha 9.0