नवी दिल्ली : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी जी-२० शिखर परिषदेच्या यशस्वी आयोजनाचे कौतुक केले. भारतातून व्हिएतनामला रवाना होण्यापूर्वी त्यांनी या जी-२० शिखर परिषदेचे भरभरून कौतुक केले. अनेक प्रश्न सोडवण्यात यंदाची परिषद यशस्वी झाल्याचे बिडेन म्हणाले.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, "ज्या क्षणी जागतिक अर्थव्यवस्था संकटात आहे, हवामान संकट, आणि संघर्षाच्या अतिव्यापी धक्क्यांमुळे हे जग त्रस्त आहे, या वर्षीच्या शिखर परिषदेने हे सिद्ध केले आहे की जी-२० अजूनही आमच्या सर्वात महत्त्वाच्या समस्यांवर तोडगा काढू शकते."