माधव गाडगीळ यांच्या ९ भाषांतील आत्मचरित्राचे आज प्रकाशन

01 Sep 2023 14:47:45

madhav gadgil 
 
मुंबई : निसर्गप्रेमी आणि नावाजलेले संशोधक शास्त्रज्ञ माधव गाडगीळ यांनी आपले वैज्ञानिक आत्मचरित्र लिहिले आहे. विशेष म्हणजे त्याच्या आत्मचरित्राचे ९ भाषांत भाषांतर झाले आहे. या सर्व पुटकांचे प्रकाशन आज दि. १ सप्टेंबर रोजी पुण्यातील गोखले अर्थशास्त्र संस्थेत दुपारी ४ वाजता होत आहे. मूळ आत्मचरित्र गाडगीळांनी इंग्रजीत लिहीले आहे. 'ए वॉक अप द लिव्हिंग विथ पिपल ॲन्ड नेचर' या नावाने हे लिहिले गेले. त्यानंतर त्याचे मराठीत भाषांतरही त्यांनी स्वत:च केले असून त्याचे नाव सह्याचला: एक प्रेम कहाणी असे ठेवले आहे.
 
त्याशिवाय कोंकणी, कानडी, मल्याळम, तमिळ, तेलगू, हिंदी व बंगाली या भाषांमध्येही त्याचे अनुवाद झाले आहेत. या सर्व पुस्तकांचे एकाच वेळी प्रकाशन होणार आहे. एकाचवेळी एकाच आत्मचरित्रांचा ९ विविध भाषांतील पुस्तकाचे प्रकाशन एकाच मंचावर होणार असल्याने ही विशेष बाब आहे. यावेळी आधुनिक भारताच्या राजकीय तसेच सामाजिक इतिहासाचे अभ्यासक, संशोधक व प्रसिद्ध लेखक रामचंद्र गुहा गाडगीळ यांची आत्मचरित्राच्या अनुषंगाने मुलाखत घेणार आहेत.
Powered By Sangraha 9.0