मुंबई (विशेष प्रतिनिधी): महसूल गुप्तचर संचलनालयाच्या (DRI) मुंबई विभागीय युनिटने मुंबईतील एअर कार्गो कॉम्प्लेक्सद्वारे थायलंडमधून भारतात तस्करी केल्या जाणाऱ्या ३०६ विदेशी प्राण्यांना शुक्रवार दि. २८ जूलै रोजी पहाटे ४च्या सुमारास पकडल्याचे वृत्त नुकतेच समोर आले. यामध्ये महसूल गुप्तचर संचलनालय आणि वाइल्डलाइफ क्राईम कंट्रोल ब्युरो (WCCB) यांनी एकत्रितपमे कारवी केली असुन ३०६ जीवंत विदेशी प्राण्यांना पकडण्यात आले आहे.
तस्करी केलेल्या या प्राण्यांमध्ये १०० टर्टल्स, ६२ टॉरटॉइजेस, ११० गोगलगाय, ३० लहान खेकडे आणि ४ स्टिंग रे मासे यांचा समावेश आहे. स्टिंग रे मासे शोभेच्या माशांसह लपवून ठेवले होते. जप्त केलेले कासव हे ग्रीक कासव, लाल पाय असलेले कासव, आशियाई स्पर्ड कासव, पिवळे ठिपके असलेले कासव, अल्बिनो रेडियर स्लाइडर कासव, आशियाई/चायनीज लीफ टर्टल आणि रेड बेलीड शॉर्ट हेड टर्टल या प्रजातींचे आहेत.
या वन्यजीवांना ताब्यात घेतल्यानंतर कायदेशीररित्या थायलंडच्या सरकारला हे प्राणी आणि तस्करी बाबत तसेच ते प्राणी पुन्हा स्वदेशी परत नेण्याबाबत पत्र लिहिले गेले होते. पण या पत्राला थायलंडकडुन कोणतेही उत्तर आले नाही. कायद्यातील पुढील तरतुदीनुसार पत्राचे उत्तर किंवा पुढील कारवाई न आल्यास हे प्राणी आपल्याच देशात रिइंट्रोड्युस म्हणजेच पुनर्विस्थापित करण्याची तरतुद आहे. त्याप्रमाणे केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणांतर्गत येणाऱ्या संग्रहालयात या प्राण्यांना ठेवण्याचा निर्णय झाला होता. दरम्यान, मुंबईतील भायखळा येथील प्राणीसंग्रहालयात हे प्राणी ठेवण्याची सोय होऊ शकली नाही म्हणुन यातील साइटीस अंतर्गत येणाऱ्या प्रजातींना गुजरातच्या जामनगर प्राणीसंग्रहालयात पाठविण्यात आले आहे.
कस्टम कायदा (१९६२) मधील तरतुदीनुसार केलेल्या उल्लंघणामुळे या तस्करावर गुन्हा दाखल करण्यात आला असुन कायद्यान्वये त्याला शिक्षा आणि दंड देण्यात येईल अशी माहिती देण्यात आली आहे.