एक्सक्लुझिव लेख - फिनटेक वित्तीय कर्ज म्हणजे मृत्यूचा सापळा?

05 Aug 2023 18:45:22

Fintech Lending
 
 
एक्सक्लुझिव लेख - फिनटेक वित्तीय कर्ज म्हणजे मृत्यूचा सापळा?
 
 
गेल्या ५ वर्षात फिनटेक (फायनान्सशिकल टेक्नॉलॉजी)चे विस्तारीकरण आधुनिक वित्तीय पुरवठा,वित्त क्षेत्रातील देवाणघेवाणेसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोगासाठी सुरू झाले.वास्तविक त्याचा उद्देश हा पारंपरिक पद्धतीचा वित्तीय संस्थाचा कारभाराला पर्याय होता.पटकन वेरिफिकेशन,लोककल्याणकारी उपयुक्तता,नवीन तंत्रज्ञान,आणि वेळेची बचत यामुळे बँकेचा लाईनीत उभ्या असलेल्या ग्राहकांना नवीन पर्याय मिळाला.नोटबंदी नंतर कॅशलेस अर्थव्यवस्थेचे भारतात महत्व वाढले.किंबहुना संपूर्ण विश्वात मोनेटरी मूल्य देवाणघेवाणीची इनव्हेंटरी म्हणून डिजिटल ट्रांजक्शन सुरू होण्यास मदत झाली.
 
 
फेडरल गोल्ड आणि कमोडिटी ट्रेडिंगसाठी आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून व्यापार करणे यामुळे शक्य झाले.कॅशलेस आणि रोख पैसे याचा मेळ म्हणून लोकांना नवीन साधन म्हणून फिनटेक फायनान्सची सुरूवात झाली. पण दुर्दैवाने हा पुढे बदमाशांचा अड्डा झाला. फिनटेक मार्फत फक्त वित्तीय सेवा नाही तर तंत्रज्ञान युगातील नवीन सेवा पुरविणाऱ्या संस्था म्हणून फिनटेक कडे पाहिले गेले.कॅशफ्लो , इनव्हेंटरी व्यवसाय, ब्लॉकचेन साठी सुरु झाला.आरबीआयच्या बँकिंग उदारमतवादी धोरणाचा फायदा काही खाजगी कंपन्या आणि परदेशी मूळ असलेल्या कंपन्यांनी घेतला.गुगल प्ले वरील अनेक अँप ही लिस्टिंग साठी वेरीफाईड असली तरी अनेक लोन कंपन्यानी वैयक्तिक माहिती चोरून परदेशी पाठवल्याचे आढळून आले.पारंपरिक कर्ज मिळत नाही किंवा विलंब होतो म्हणून अनेक जण या कंपन्याचे झटपट कर्ज घेतात.
 
 
१४ ते १५ टक्के दराने व नंतर उशीर झाल्यास अजून चक्रीवाढ व्याज घेण्याचा सपाटाच काही कंपन्यांनी लावला.वेळेवर हप्ते न भरल्यास ग्राहकांना प्रचंड मानसिक त्रास सुरू झाला. अनेक जणांनी आत्महत्या केल्या.खासकरून महिला असतील तर मोबाइलवरचा डेटा चोरून खाजगी व्हिडिओ फोटो प्रसारित करू असे ब्लँकमेल झाल्याची उदाहरणे समोर आली.या विषयी समाज माध्यमात लिहिले देखील आहे.मागील वर्षी चीनच्या सुमारे ४०० अँप वर भारताने बंदी घातली.डेटा चोरून हेरगिरी व ग्राहकांना मानसिक त्रास ही त्यामागची मुख्य उद्दिष्ट होती.
 
 
या व्यवसायात भारतातील फिनटेक क्षेत्रातील कंपन्यांचा सहभाग मोठ्या प्रमाणात आहे.अशी अँप डाऊनलोड करताना कोणत्याही प्रकारची संमती न विचारता देखील खाजगी माहितीचा डेटा कंपनी गोळा करते. किंवा ग्राहक कुठल्याही प्रकारचा अटी शर्ती न वाचता सह्या करतात.त्याची परिणती म्हणजे मानसिक त्रास.नुकत्याच बेंगलोर येथील २२ वर्षांचा मुलाने त्रासाला कंटाळून आत्महत्या केली यावर अजूनही कुठला ठोस कायदा नाही.माहिती आणि तंत्रज्ञान कायद्यात यासंबंधी कुठली अमेंडमेंट येण बाकी आहे.आत्महत्येस प्रवृत्त करणे या कलमाखाली पोलिसांनी आरोपी किंवा गुन्हेगारांना अटक केली तरी जीव गमावणारी व्यक्ती पुन्हा येणार नाही.लोकांच्या मजबुरीचा फायदा या कंपन्या घेत आल्या आहेत.
 
 
मार्च २३ मध्ये चीनी कंपन्यांची १०४ कोटींची मालमत्ता ईडीने जप्त केली.अनेक कलमांच्या खाली ही कारवाई मनी लाँड्रिंगसाठी केली गेली होती.या कंपन्या कुठलीही केवायसी नॉमिनेशनची प्रकिया करत नाहीत. या आरबीआयच्या परवानगी न घेता नवीन सेवासुविधा देतात किंवा नकली नावाच्या डायरेक्टर किंवा कंपनीचा नावाने फंड ट्रांसफर करतात.उदाहरणार्थ Baryonyx Technology and Cloud Atlas Future Technology या कंपन्यावर १०४ कोटींची कारवाई करण्यात आली.विविध कायद्यांतर्गत डिजिटल लोन नियम अस्तित्वात आहे.परंतु या कंपन्यांना आधीच पळवाटा माहिती असतात. सोशल मीडियावरचा आक्रमक जाहीरातींना गरजू माणूस फसतो आणि त्या दलदलात अडकत जातो.
 
 
२०१० पूर्वी काही बँकाने रिकवरीसाठी गुंड नेमले होते.परंतु कारवाईनंतर ते प्रकार बंद झाले.पूर्वीच्या काळात सावकार होते.फरक एवढाच की या डिजिटल एप्लिकेशन बिना तारण,कागदपत्रे कर्ज देतात. आणि पैशासगट तुमच्या मेंदूचा ताबा घेतात.भारतातच नाही जागतिक स्तरावर हे प्रमाण वाढले आहे.केवळ कर्जासाठी नाही पण आंतरराष्ट्रीय सुरक्षेसाठी हा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
 
वर्ल्ड बँक या जागतिक फोरमवर यासाठी नियमावलीसाठी चर्चा अपेक्षित आहे.याशिवाय सायबर हल्ला व हैक हाही प्रकार अस्तित्वात आहे.यामुळे खरी फिनटेक इको सिस्टीमला चालना देण्यासाठी सरकार नक्कीच प्रयत्नशील आहे.वैयक्तिक पातळीवर देखील सावध राहण्याशिवाय नागरिकांना पर्याय नाही.
 
 
येत्या ५ वर्षात नो कोड टेक्नॉलॉजी सुद्धा भारतात मोठ्या प्रमाणात सुरू होईल असा अंदाज आहे ‌.नो कोड मध्ये देखील संपूर्ण एक्सेस युजरला मिळू शकत नाही.सिक्युरिटी हा फिनटेक मध्ये महत्वाचा प्रश्न आहे. निश्चितच त्याची उपयुक्तता मोठी आहे परंतु वैयक्तिक पणे मला अस वाटत की लक्झरी डेव्हलपमेंट कोणाला नको असते.पण त्याच मुलभूत फंक्शनिंग सुरक्षित झाले पाहिजे तर खरोखर फिनटेकचा वापर रूचकर होईल.हा डिजिटल कर्जाचा हप्ता म्हणजे मृत्यूचा सापळा होणार असेल तर नक्कीच लोकांना नवीन मार्ग काय हा प्रश्न उपस्थित होतो.
                                                               
                                                                                                                                                       
                                                                                                                                                  मोहित सोमण
 
Powered By Sangraha 9.0