रोहिणी हट्टंगडी आणि दिलीप प्रभावळकरांचा नवा चित्रपट लवकरच...

04 Aug 2023 18:17:00

rohini and dilip 
 
 
 
 
 
मुंबई : केदार शिंदे दिग्दर्शित 'बाईपण भारी देवा' या चित्रपटाच्या यशानंतर अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी आता पुन्हा एकदा नव्या चित्रपटासाठी सज्ज झाले आहेत. ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर आणि रोहिणी हट्टंगडी यांची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट म्हणजे ‘आता वेळ झाली’. या मराठी चित्रपटाची कथा सत्य घटनेवर आधारित असून हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे.
‘आता वेळ झाली’ हा चित्रपट खऱ्या आयुष्यातील व्यक्तिरेखांवर आणि त्यांच्या अनुभवावर बेतलेला आहे. चित्रपटाची कथा खिळवून ठेवणारी, काहीशी गमतीदार आणि तरीही भावनात्मक आहे.
 
दोन जीवांची ही कथा प्रेरक साहसी आहे आणि तरीही ती अस्तित्वाबद्दल चक्रावून टाकणारे प्रश्न निर्माण करणारी सुद्धा आहे.
‘आता वेळ झाली’ या चित्रपटाची आत्तापर्यंत अनेक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांसाठी निवड झाली आहे. डल्लास इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल, पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल (सर्वोत्कृष्ट अभिनेता), राजस्थान इंटरनॅशनल फिल्म फेस्टीव्हल (सर्वोत्कृष्ट चित्रपट आणि दिग्दर्शक) आणि लोकप्रिय जागरण फिल्म फेस्टिव्हल यांचा त्यात समावेश आहे.
Powered By Sangraha 9.0