चारकोप येथे डंपरच्या धडकेत महिलेचा मृत्यू

04 Aug 2023 19:05:44

accident


मुंबई : मुंबईतील कांदिवली पश्चिम येथील चारकोप परिसरात गुरुवार दिनांक ४ ऑगस्ट रोजी एका ३२ वर्षीय महीलेचा डंपरच्या धडकेत मृत्यू झाला असून या प्रकरणी चारकोप पोलिसाकडून संबंधित डंपर चालक राहुल यादव यावर गुन्हा दाखल करत अटक करण्यात आली आहे.
 
गुरूवारी दुपारी १.३० च्या सुमारास चारकोप परिसरातील लिंक रोड वर नेहा पांडे या ३२ वर्षीय महिला आपल्या दुचाकीवरून जात असता डंपरचालक राहुल यादव याने नेहा पांडे यांना धडक दिली.
 
दरम्यान गंभीर जखमी झालेल्या नेहा पांडे यांना रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. दरम्यान संबंधित आरोपी विरोधात नेहा यांच्या भावाच्या तक्रारीवरून चारकोप पोलिसांकडून गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून डंपर चालकास अटक करण्यात आल्याचेही पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.


Powered By Sangraha 9.0