जळगाव : भडगाव तालुक्यात एका घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. काकाच्या घरी टीव्ही पहायला गेलेली ८ वर्षाची चिमुकली तिच्या घरी परतलीच नाही. तीन दिवसानंतर चिमुकलीचा गुरांच्या गोठ्यात मृतदेह आढळून आला होता. पोलिसांनी या घटनेतील संशयीतास अटक केली आहे. मुलीवर लैंगिक अत्याचार केल्यानंतर झालेल्या झटापटीत मुलीच्या डोक्यात दगड टाकून तिची हत्या केल्याची कबूली संशयिताने दिल्याची माहिती समोर आली आहे.
या घटनेमुळे संपुर्ण जळगाव हादरलं असुन या घटनेच्या निषेधार्थ मूक मोर्चा काढण्यात येत आहे. दोन दिवसांपूर्वी ही मुलगी तिच्या गावातून गायब झाली होती. यानंतर कुटुंबियांकडून या मुलीचा सर्वत्र शोध घेतला जात होता. त्यानंतर एका ठिकणी दुर्गंधी येत असल्यामुळे पाहिले असता गोठ्यातील चाऱ्यात मुलीचा मृतदेह आढळून आला. पोलिसांकडून या प्रकरणी चौकशी सुरू केली असता एका तरुणाच्या हालचाली संशयास्पद आढळून आल्या होत्या. चौकशीनंतर पोलिसांनी त्या तरुणाला ताब्यात घेतले आहे.