जळगाव : भडगाव तालुक्यात एका घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. काकाच्या घरी टीव्ही पहायला गेलेली ८ वर्षाची चिमुकली तिच्या घरी परतलीच नाही. तीन दिवसानंतर चिमुकलीचा गुरांच्या गोठ्यात मृतदेह आढळून आला होता. पोलिसांनी या घटनेतील संशयीतास अटक केली आहे. या आरोपीचे नाव स्वप्निल पाटील असे आहे. शेजारीच राहणाऱ्या मुलाने हे कृत्य केल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत दिली.
या घटनेमुळे संपुर्ण जळगाव हादरलं असुन या घटनेच्या निषेधार्थ सकल मराठा समाज न्याय समितीकडून घटनेच्या निषेधार्थ मूक मोर्चा काढण्यात येत आहे. तर, जळगाव घटनेची चौकशी सुरु केली असुन आरोपीस शिक्षा होणारचं असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे.