शेतकऱ्यांसाठी खूष खबर ! प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा लाभ लवकरच

30 Aug 2023 16:24:50
Farmer
 
 
 
शेतकऱ्यांसाठी खूष खबर !  प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा लाभ लवकरच
 
 

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ( पीएम किसान योजना) ही केंद्र सरकारची महत्वकांक्षी योजना आहे. छोट्या, लघु, मध्यम शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रगतीसाठी व त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी ही योजना सुरू झाली होती.  याच अंतर्गत २४ नोव्हेंबर २०१९ ला सुरू झालेल्या योजनांची अंमलबजावणी संपूर्ण देशात होत आहे.
 
 
पात्र शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत वार्षिक ६००० रुपयांचे आर्थिक सहाय्य दिले जाते.  ३ टप्यात ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होते.याचाच १४ वा टप्पा म्हणून खात्यात रक्कम जमा होण्याच्या प्रक्रियेचा पुन्हा प्रारंभ होत आहे.  आर्थिक ताळेबंदी टाळण्यासाठी व शेतकी खर्चात थोडा दिलासा मिळण्यासाठी हे अर्थसहाय्य करण्यात येते.  यातून नवीन अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शेती व्यवसाय करण्यासाठी हे प्रोत्साहन दिले जाते.
 
 
पीएम किसान योजनेचा १४ व्या टप्प्याची रक्कम जमा होण्याची अंतिम मुदत मे २०२३ होती.  या योजनेचा अटी शर्तींची पूर्तता झालेल्या शेतकऱ्यांनाच या योजनेचा आर्थिक लाभ दिला जाणार आहे.  pmkisan.gov.in  या  संकेतस्थळावर यासंबंधीची अधिक माहिती प्राप्त करता येणार आहे.  १४ हेक्टर क्षेत्राहून कमी क्षेत्रफळाच्या शेतकऱ्यांना ही योजना लागू आहे.
 
Powered By Sangraha 9.0