पर्सनल फायनान्स - कर्ज घेताय? मग हा विचार जरूर करा
कर्ज परताव्यासाठी कुठला प्रकार चांगला ?
दैनंदिन आयुष्यात वेगवेगळ्या प्रकारच्या कर्जाची मदत लोक घेत असतात. मग ते गृह कर्ज, वाहन कर्ज,खाजगी कर्ज व कुठलेही कर्ज, कर्जाचा बोजा कसा निपटावा हा प्रश्न मनात येणे सहाजिकच आहे. योग्य नियोजनातून समस्या सुटू शकतात तसे कर्ज देखील वेळेत फेडता येऊ शकते. नियोजन अंतिमतः मानसशास्त्रीय कारणांमुळे शक्य होते. कर्ज कुठल्या उद्देशाने घेतले व त्याचा परतावा कसा करणार हा विचार नेमकेपणाने केल्यास भविष्यात अर्थ व कर्ज डोईजड होत नाही.
साधारण या कर्ज परताव्यासाठी दोन प्रकारच्या रणनीती आखण्यात येतात त्या म्हणजे १) स्नो बॉल पद्धत २) अवलांच पद्धत
१) स्नो बॉल पद्धत - ही रणनीती छोट्या ध्येयासाठी वापरली जाते. कर्जाची मुद्दल व व्याज कितीही असले तरी थोडी रक्कम भरून सुरूवात केल्यास एक जबाबदारी पार पाडत असल्याचा मनात भावना येतात. त्यामुळे टप्याटप्याने कर्जाची रक्कम जमा करण्यासाठी जी प्रेरणा मिळते त्याला स्नो बॉल पद्धत म्हणतात. कालावधीपेक्षाही कर्जाचा भार हळूहळू कमी होण्यास मदत होते. जर एकाहून अधिक कर्जाचा डोलारा अधिक असल्यास मोठ्या कालावधीसाठी ही रणनीती उपयोगी ठरली जाते.
२) अवलांच पद्धत - अवलांच पद्धत विशिष्ट रणनिती आखल्यास सफल होते. मुद्दल व त्यावरील व्याज रक्कम याचा व्यवहारिक दृष्टीकोनातून विचार केल्यानंतर पूर्वाधातच कर्जाच्या हप्त्याची रक्कम ठरवणे. नियमित रिपेमेंटमुळे व्याजाचा बोजा हलका होतो. विशेषतः व्याजदर संतुलित ठेवण्यासाठी सुरुवातीपासून मोठी रक्कम मोजली जाते. या पद्धतीला अवलांच पद्धत म्हणतात. एकाहून अधिक कर्ज नसल्यास या रणनीतीचा वापर मोठ्या कर्जाची परतफेड करण्यासाठी होतो. अर्थात या पद्धतीत दूरगामी कर्जाचा विचार केला जातो.
आपले कर्ज, व्यवहारिकता, गरज ओळखून नियोजन केल्यास कर्जाचा मोठा दबाव राहत नाही. नियोजनबद्ध गुंतवणूकीसंबंधी कर्जाचा योग्य विनिमय व परतावा केल्यास सकारात्मक बदल आर्थिक नियोजनावर निश्चित होतो.