मुंबई : आयकर परतावा भरण्याची अंतिम मुदत संपली आहे. यावेळी ६ कोटींहून अधिक लोकांनी आयकर परतावा भरला आहे. आयटीआर फाइल केल्यानंतर, करदाते त्यांच्या आयटीआर फाइलवर प्रक्रिया होण्याची आणि परतावा मिळण्याची प्रतीक्षा करतात.
ज्यांनी आयकर परतावा भरला आहे, त्यांना आपला परतावा मिळवण्यासाठी एक मॅसेज येत आहे. ज्यामध्ये तुमच्या फाईलची प्रक्रिया झाली आहे, तुम्हाला एकूण इतकी रक्कम मिळणार आहे, असे लिहिले आहे. हे सर्व पैसे तुमच्या खात्यात जमा केले जातील, फक्त पैसे काढण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि तुमचा परतावा मिळवा.
पीआयबीने फॅक्टचेकमध्ये अशा मॅसेजचा भंडाफोड केला आहे, ज्यामध्ये करदात्यांना सुचना देण्यात आली आहे. पीआयबीने शेअर केलेल्या स्क्रीनशॉटमध्ये, तुम्ही पाहू शकता की एक मेसेज आला आहे, ज्यामध्ये असे लिहिले आहे की "तुमच्या नावावर १५,४९० रुपये आयकर परतावा मंजूर झाला आहे, लवकरच तुमच्या खात्यात रक्कम जमा केली जाईल. खाते क्रमांक ५एक्सएक्सएक्स६७५५ सत्यापित करा, जर हा खाते क्रमांक बरोबर नसेल तर खाली दिलेल्या लिंकवर जा आणि तुमचे बँक खाते तपशील अपडेट करा.