हायब्रीड वर्क मोड हा अधिक लोकप्रिय - सर्व्ह

29 Aug 2023 16:40:34
Work model
 
 
 
हायब्रीड वर्क मोड हा अधिक लोकप्रिय - सर्व्ह
 

२९ टक्के लोकांना Hybrid मॉडेल पसंतीस
 

नवी दिल्ली:   IANS या वृत्तसंस्थेने दर्शविलेल्या सर्व्हनुसार हायब्रीड कामाची पद्धत सर्वांत जास्त नोकरदारांना पसंत पडली आहे. २९ टक्के लोकांना कामाचा हायब्रीड प्रकार जास्त पसंतीस उतरला आहे. ग्लोबल डेटा या डेटा Analytics  कंपनीने हा सर्व्हे केला आहे. कोविड काळापूर्वी वर्क फ्रॉम ऑफिस कार्यप्रणाली वर्षांनुवर्ष प्रचलित होती. परंतु कोरोना काळात वर्क फ्रॉम होम ही नवी संकल्पना घराघरात पोहोचली.
 
कोविड काळातील निर्बंधामुळे या पद्धतीशिवाय कंपन्याना गत्यंतरच नव्हते. परंतु बदलत्या परिस्थितीत कामाचे स्वरूप, रूपरेषा, कामाची पद्धत, व्यवहारिकता अशा नेक मुद्यांवर वर्क फ्रॉम होम आणि वर्क फ्रॉम ऑफिस हे अवलंबून असते.  परंतु यात नवीन प्रवाह म्हणजेच वर्क हायब्रीड प्रकार लोकप्रिय होऊ लागला आहे.  त्याचीच परिणती म्हणून हायब्रीड कल्चरची लोकप्रियता या सर्व्हतून जाणवली. सर्वात जास्त लोकप्रियता हायब्रीड ऑफिस मॉडेलला पसंती मिळाली याच कारणासाठी मिळाल्याचे सर्व्हमध्ये आढळले आहे.
 
हायब्रीड प्रकारातील घर आणि कार्यालय यांच्यातील कार्यालयीन कामाचा समतोल, लवचिकता ही त्याची प्रमुख कारणे आहेत. ' एकूण कामाच्या विभागणीत घरातील दैनंदिन जीवन आणि कार्यालयीन कामासाठी लवचिकता यासाठी हायब्रीड पद्धतीत लोकांना आवडला आहे असे शेरला श्रीपदा या ग्लोबल डेटाच्या Business Fundamental Analytics याप्रसंगी बोलल्या.
 
Powered By Sangraha 9.0