मुंबई : राज्य शासनाकडून राज्यातील सर्व जिल्ह्यांतील जिल्हा परिषदांमधील रिक्त जागांकरिता अर्ज मागविण्यात आले होते. 'क' गटाच्या विविध संवर्गातील १९,४६० रिक्त जागांसाठी १४ लाखांहून अधिक अर्ज शासनाला प्राप्त झाले आहेत. तसेच, आतापर्यंत आलेल्या अर्जांच्या माध्यमातून राज्य सरकारच्या तिजोरीत १४५ कोटींची भर पडली आहे. या भरतीसाठी खुला वर्गासाठी परीक्षा शुल्क १,००० रुपये तर राखीव वर्गासाठी ९०० रुपये आकारण्यात आले.
दरम्यान, राज्यातील ३४ जिल्हा परिषदांमध्ये १९ हजार ४६० पदांची नोकरभरती होणार असून त्यासाठी तब्बल ४१ लाख ५१ हजार उमेदवारांनी अर्ज केले असून एका जागेसाठी सरासरी ७५ उमेदवार स्पर्धेत आहेत. देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त फडणवीस-शिंदे सरकारने शासकीय विभागांमधील ७५ हजार पदांची भरती करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार तलाठी भरतीची प्रक्रिया सुरू असून आता जिल्हा परिषदांमधील रिक्तपदांसाठी अर्ज मागविले आहेत. ५ ते २५ ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याची मुदत होती.