नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत सध्या जी-२० परिषदेची तयारी सुरू आहे. या बैठकीला २० देशांचे राष्ट्रप्रमुख उपस्थिती लावणार आहेत. त्यामुळे दिल्लीत सुरक्षा व्यवस्थेचा कडेकोट बंदोबस्त करण्यात आलेला आहे. त्यातच आता काही खलिस्तानी कट्टरपंथीयांनी दिल्लीतील पाच मेट्रो स्टेशनवर खलिस्तान समर्थकांकडून घोषणा लिहिण्यात आल्या आहेत.
या प्रकरणाची माहिती मिळताच दिल्ली पोलिसांनी तपास सुरू केला आहे. दुसरीकडे दिल्लीत जी-२० परिषदेपूर्वी झालेल्या या कृत्यामुळे गुप्तचर यंत्रणाही सक्रिय झाल्या आहेत. ८ ते १० सप्टेंबर दरम्यान दिल्लीत जी-२० परिषद होणार आहे. या परिषदेच्या आयोजन उधळून लावण्याची धमकी शीख फॉर जस्टिस या दहशतवादी संघटनेच्या प्रमुख असलेल्या गुरपतवंत सिंह पन्नू याने दिली आहे.
त्याने एक व्हीडिओ जाहीर करत या धमक्या दिल्या आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, शिवाजी पार्क, मादीपूर, पश्चिम विहार, उद्योग नगर, महाराजा सूरजमल स्टेडियम, सरकारी सर्वोदय बाल विद्यालय नांगलोई, पंजाबी बाग आणि नांगलोई मेट्रो स्टेशनच्या बाहेर या घोषणा लिहिण्यात आल्या आहेत.