मुंबई : रेल्वे जमीन विकास प्राधिकरण अंतर्गत रिक्त पदांची भरती करण्यात येत आहेत. या रिक्त पदांसाठी अर्ज मागविण्यास सुरुवात झाली असून प्राधिकरणाकडून अधिसूचना जारी करण्यात आली आहे. दरम्यान, रेल्वे जमीन विकास प्राधिकरण अंतर्गत रिक्त जागांसाठी भरती, नागपूर केली जाणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली असून एकूण ५ रिक्त जागांसाठी ही भरती केली जाणार आहे.
या भरतीप्रक्रियेतंर्गत “सह महाव्यवस्थापक / उपमहाव्यवस्थापक” पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. त्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ सप्टेंबर २०२३ आहे.
वरील पदांकरीता अर्ज ऑफलाईन /ऑनलाईन (ई-मेल)पद्धतीने सादर करायचा आहे. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर खालील दिलेल्या संबंधित पत्त्यावर सादर करावे. अपूर्ण अर्ज किंवा योग्य चॅनेलद्वारे प्राप्त झालेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा स्वीकार करण्यात येणार नाही.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – Dy. महाव्यवस्थापक (एचआर) रेल लँड डेव्हलपमेंट अथॉरिटी युनिट क्र. ७०२ – बी ७ वा मजला कॉन्मनेक्टस टॉवर – II DMRC बिल्डिंग, अजमेरी गेट दिल्ली -११००२.
ई-मेल पत्ता – vacnotice2223@gmail.com
अधिक माहिती जाणून घेण्यासाठी अधिकृत वेबसाईट – rlda.indianrailways.gov.in ला भेट द्या.