सातारा : साताऱ्यातून एक धक्कादायक बातमी पुढे आली आहे. सातारा-पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात घडला आहे. या अपघातात ३ जणांचा जागीच मृत्यू झाला तर ४ जण गंभीर जखमी झाले आहेत. आज सकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला आहे.
महामार्गावर महिंद्रा पिकअप थांबली असता पाठीमागून येणाऱ्या तवेरा गाडीचा टायर फुटला. टायर फुटल्याने तवेरा गाडीने समोर असलेल्या पिकअपला जोरदार धडक दिली. यात तीन जण जागीच दगावले. जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. निखिल शशिकांत चौखंडे, प्रियांका निखिल चौखंडे, शशिकांत यदुनाथ चौखंडे अशी मृत व्यक्तींची नावे आहेत.