द्राक्षांसाठी उपयुक्त ठरलेल्या ‘कम्बाईन’ची २५ वर्ष

25 Aug 2023 21:15:36


Godrej Event

मुंबई (विशेष प्रतिनिधी): द्राक्ष बागायतदारांसाठी फायदेशीर ठरलेल्या ‘कम्बाईन’ या रासायनिक औषधाने केलेल्या यशस्वी रौप्य महोत्सवाचा कार्यक्रम शुक्रवार दि. २५ ऑगस्ट रोजी मुंबईत पार पडला. विक्रोळीतील गोदरेज कंपनीच्या ऍग्रोव्हेट मार्फत आयोजित या कार्यक्रमात २५ वर्ष यशस्वीपणे पुर्ण केलेल्या ‘कम्बाईन’ उत्पादनाची यशोगाथा सांगितली गेली.


कार्यक्रमाच्या सुरूवातीला गोदरेज कंपनीच्या इतिहास आणि एकुण प्रवासाबद्दल उपस्थितांना माहिती देण्यात आली. त्यानंतर ऍग्रोव्हेटचे व्यवस्थापकीय संचालक बलरामसिंघ यादव यांनी मार्गदर्शन केले. मुख्य कार्यकारी अधिकारी राजावेलू यांनीही उत्पादनाच्या एकुण प्रवासाबद्दल सांगितले. ४०० दशलक्ष डॉलर्स इतक्या किमतीची द्राक्षे वर्षाकाठी निर्यात करणाऱ्या आपल्या देशाच्या कामात गोदरेज एक मोठा भागीदार असल्याचा ते अभिमान व्यक्त करतात. यावेळी गोदरेजचे अध्यक्ष नादिर गोदरेज ही उपस्थीत होते.


Godrej Event


गोदरेज ऍग्रोव्हेट कंपनीच्या ‘कम्बाईन’ या रसायनाची निर्मिती द्राक्ष उत्पादनात चांगले उत्पन्न घेता यावे या दृष्टीकोनातुन केली गेली होती. यामध्ये सुपर शक्ती आणि डायमोर या दोन रसायनांचा एकत्रित वापर केला जातो, त्यामुळे याला कम्बाईन म्हणतात. यांचा वापर करणारे अनुभवी बागायतदार ही या कार्यक्रमाला उपस्थीत होते. त्यांनी आपले अनुभव तसेच द्राक्ष बागायतीमध्ये येणाऱ्या आव्हानांविषयी चर्चा केली. २३ वर्षांचा द्राक्ष बागायतीचा अनुभव असणारे प्रभाकर मोरे, २७ वर्षांचा अभ्यास आणि अनुभव असणारे डॉ. रामटेके आणि गोदरेजचे राजावेलु यांनी यावेळी परिसंवाद ही साधला. तसेच, या रसायनाच्या यशस्वीतेमुळे अनेक बनावट आणि खोटी उत्पादने ही बाजारात आली होती. ग्राहकांची फसवणुक टाळुन त्यांच्या पर्यंत योग्य उत्पादन पोहोचावं या दृष्टीकोनातुन २५ व्या वर्षपुर्तीनिमित्त गोदरेजने या उत्पादनाच्या नविन पॅकेजिंगचेही अनावरण यावेळी केले.


Powered By Sangraha 9.0