तेजस ठाकरेंनी सह्याद्रीमध्ये शोधली सापाची नवी प्रजात

    23-Aug-2023
Total Views |

tejas thackrey



मुंबई (विशेष प्रतिनिधी): 
महाराष्ट्रातील पश्चिम घाटातील आंबोलीमधुन ‘ठाकरे वाईल्डलाइफ फाऊंडेशन’ आणि जर्मनी व इंग्लंडमधील काही संशोधकांनी सापाच्या एका नवीन प्रजातीचा शोध लावला आहे. पश्चिम घाटातील सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये ही प्रजात आढळली असुन तिचे नाव ‘सह्याद्रीओफिस उत्तराघाटी’ ठेवण्यात आले आहे. याबद्दलचा शोधनिबंध ‘टॅक्सोनॉमी’ या आंतरराष्ट्रीय नियतकालिकात प्रकाशित करण्यात आला आहे.


हा शोधनिबंध ठाकरे वाईल्डलाइफ फाऊंडेशनचे तेजस ठाकरे, हर्शिल पटेल, लंडनमधील नॅशनल हिस्ट्री म्युझियमचे पॅट्रीक कॅम्पबेल आणि जर्मनीतील प्लँक इन्स्टिट्यूटचे झीशान ए मिर्झा या संशोधकांनी लिहिला आहे. पश्चिम घाटातील जैवविविधतेचे केल्या जाणाऱ्या सातत्यपुर्ण सर्वेक्षणामध्ये सापाची ही प्रजात आढळली आहे.


काय आहे नावाचा अर्थ?

पश्चिम घाटासाठी संस्कृतमध्ये ‘सह्याद्री’ हा शब्द वापरला जातो, तसेच ग्रीक शब्द ‘ओफिस’ म्हणजे साप या अर्थी सह्याद्रीओफिस असे नाव ठरले. तर, उत्तर दिशा दर्शविणारा ‘उत्तर’ हा शब्द आणि पर्वत किंवा घाटात वास्तव्य असलेला म्हणुन ‘घाटी’ या अर्थी उत्तरघाटी हा शब्द वापरला आहे. म्हणुन या नव्याने सापडलेल्या सापाच्या प्रजातीचे नाव ‘सह्याद्रीओफिस उत्तराघाटी’ असे ठेवण्यात आले आहे.



आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.